महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा : 'मास्क नाही, प्रवेश नाही’ मोहिमेची पालकमंत्र्यांकडून सुरुवात, स्वतःच्या वाहनाला लावले स्टिकर

बुलडाण्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेची स्वत:पासून सुरुवात केली आहे. 'मास्क नाही, प्रवेश नाही' असा संदेश असणारे स्टीकर लावून त्यांनी कोविड जनजागृती अभियान सुरू केले आहे.

No masks, no Entry' Covid Awareness campaign
मास्क नाही, प्रवेश नाही’ मोहिमेची पालकमंत्र्यांकडून सुरुवात

By

Published : Sep 30, 2020, 9:12 PM IST

बुलडाणा - 'माझे कुटूंब, माझी जबाबदारी' मोहीम जिल्ह्यात प्रभावपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमे अतंर्गत कोविडपासून बचावासाठी जनजागृती करण्यात येत आहे. या जनजागृतीसाठी 'मास्क नाही, प्रवेश नाही' संदेश असणारा स्टीकर प्रकाशित करण्यात आले आहेत. असा स्टीकर आपल्या वाहनाला लावून राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जनजागृतीची सुरूवात स्वत:पासून केली आहे. कोविडपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे व सोशल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रींचा उपयोग करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी केले आहे.

हेही वाचा - नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा, पालकमंत्री शिंगणेंचा आदेश

कोविडच्या काळात सतत विविध माध्यमातून शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी ही मोहीम त्यासाठी निर्णायक ठरणार आहे. या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणावर कोविडची जनजागृती करण्यात येत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी स्वत:पासून सुरुवात करीत आपल्या वाहनावर ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ मोहिमेचे स्टिकर आपल्या वाहनावर लावले आहे. नागरिकांनी स्वत:चे व कुटूंबाचे रक्षण करण्यासाठी मास्कचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details