महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गावात अवैध दारू विक्री वाढल्याने महिलांनीच गावात भरवला दारूचा बाजार

गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात महिलांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने संतापलेल्या महिलांनी अखेर मंगळवारी 13 जुलै रोजी गावात दारू विक्रीचा बाजारच लावला आणि हा बाजार चक्क सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच होता.

गावात अवैध दारू विक्री
गावात अवैध दारू विक्री

By

Published : Jul 14, 2021, 9:57 PM IST

बुलडाणा -गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री संदर्भात महिलांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने संतापलेल्या महिलांनी अखेर मंगळवारी 13 जुलै रोजी गावात दारू विक्रीचा बाजारच लावला आणि हा बाजार चक्क सायंकाळी साडेचार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच होता. हा बाजार संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ गावातील महिलांनी लावला होता.

गावात अवैध दारू विक्री वाढल्याने महिलांनीच गावात भरवला दारूचा बाजार

पोलिसांनी कारवाई न केल्याने केले आंदोलन -
संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ गावात अवैध दारू विक्री वाढल्याने गावातील अनेक कुटुंबात वाद होतात, सध्या शाळा बंद असल्याने लहान मूले घरीच असतात आणि दारुड्यांचे संस्कार लहान मुलांवर पडतात. यामुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झालीत. अनेकदा पोलिसांत तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याने गावातील महिलांनी दारू विक्रीचा बाजार भरवून आंदोलन केले आहे. जोपर्यंत गावातील अवैध दारू विक्री बंद होत नाही, तोपर्यंत गावातील सर्व महिला दारू अशीच बिनधास्तपणे विक्री करणार असल्याचा पवित्रा महिलांनी घेतला.

पोलीसांच्या भूमिकेकडे लक्ष-
चांगेफळ हे आदिवासी बहुल गाव असून या परिसरात अनेक अवैध दारू बनविण्याचे कारखाने बिनधास्तपणे सुरू असल्याचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे या महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी आता सर्रास दारू विक्री करण्याचा निर्णय घेवून आंदोलन केल्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा -School Reopen : कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग उद्यापासून होणार सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details