बुलडाणा- जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मनीषा पवार यांनी १४ जानेवारीला पदभार स्वीकारला. यावेळी मनीषा पवार या बैलगाडीतून प्रवास करत जिल्हा परिषद आवारात पोहोचल्या. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या प्रवेशाने जिल्हा परिषद परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते.
नवनिर्वाचित अध्यक्षांनी बैलगाडीतून प्रवास करुन जिल्हा परिषदमध्ये स्वीकारला पदभार - mahavikas aaghadi Leader Manisha Pawar
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. त्यानंतर १४ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला.
![नवनिर्वाचित अध्यक्षांनी बैलगाडीतून प्रवास करुन जिल्हा परिषदमध्ये स्वीकारला पदभार buldana](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5726230-thumbnail-3x2-op.jpg)
मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती. त्यानंतर आज जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या अध्यक्षा मनीषा पवार यांनी आपला पदभार स्वीकारला. शिवसेनेचे कमल बुधवत यांनी आपल्या उपाध्यक्ष पदाचा पदभार एक दिवस आधीच स्वीकारला होता. दरम्यान, १४ जानेवारीला जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून काढण्यात आलेल्या रॅलीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार या बैलगाडीमध्ये बसून जिल्हा परिषदेमध्ये पदभार स्वीकारायला पोहोचल्या. रॅलीत पवार यांच्याबरोबर महाविकास आघाडीचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर प्रामुख्याने ग्रामीण भागातील विकासाला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी अध्यक्षा मनिषा पवार यांनी सांगितले.
हेही वाचा-चिखली-अमडापूर मार्गावरील कार अपघातात दोन जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी