महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 11, 2020, 7:50 PM IST

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात नवीन सहा कोरोनाबाधित आढळले

आज पुन्हा नव्याने 6 रुग्ण कोरोनाबाधित आल्याने जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार करून 102 झाला आहे. जिल्ह्यात एकूण 102 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना अपडेट बुलडाणा
कोरोना अपडेट बुलडाणा

बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. कोवीड रुग्णालयात धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध 9 जून रोजी दाखल झाले होते. त्याच दिवशी रात्री अतिदक्षता विभागामध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज (11 जून) पॉझिटिव्ह आला आहे. तर आज पुन्हा नव्याने 6 रुग्ण कोरोनाबाधित आल्याने जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरी पार करून 102 झाला.

नवीन 6 कोरोनाबाधित रुग्णांमध्ये भीमनगर, मलकापूर येथील 62 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय तरुण, 60 वर्षीय महिला, धोंगर्डी ता. मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध, मलकापूर येथीलच 45 व 55 वर्षीय पुरूष रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे आज बुलडाणा कोविड केअर सेंटर येथून साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील 04 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरुणीचा समावेश आहे. तसेच खामगांव येथील कोविड रूग्णालयातून 2 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये 36 वर्षीय पुरूष समता कॉलनी, खामगांव व 27 वर्षीय महिला पुरवार गल्ली, खामगांव येथील रुग्णांचा समावेश आहे. अशाप्रकारे 6 रुग्णांना आज सुट्टी मिळाली आहे.

तसेच आतापर्यंत एकूण 1,675 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 102 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 72 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रूग्णालयात 26 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आज 70 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 6 पॉझिटिव्ह, तर 64 निगेटिव्ह आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 12 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1,675 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details