बुलडाणा - जिल्ह्यासाठी रविवारचा दिवस कोरोनामुक्त जिल्हा झाल्याच्या बातमीनंतर दिलासादायक ठरला होता. मात्र, आज(सोमवार) जळगाव जामोद येथे आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने बुलडाणेकरांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
कोरोनामुक्त बुलडाणा जिल्ह्यात आणखी एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद - one more positive case found in corona free buldana
जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे 45 वर्षीय नागरिक कोरोनाबाधित आढळला आहे. यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. जळगांव जामोद येथे आढळून आलेला कोरोनाबाधित व्यक्ती व त्याचा भाऊ दुचाकीवरून आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी 7 मे रोजी मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर येथे गेले होते.
रविवारी ग्रीन झोनमध्ये दाखल झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद येथे एक 45 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून अल्याने जिल्ह्यात पुन्हा एकदा चिंतेचे सावट पसरले आहे. जळगांव जामोद येथे आढळून आलेला कोरोनाबाधित व्यक्ती व त्याचा भाऊ दुचाकीवरून आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी 7 मे रोजी मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर येथे गेले होते. दरम्यान या अंत्यविधीला उपस्थित काहींना कोरोनाची लागण असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. म्हणून त्या दोघांनी परत आल्यानंतर जळगांवच्या आरोग्य विभागाकडे याबाबत माहिती दिली. आरोग्य विभागाने खांमगाव येथील रुग्णालयात जाऊन कोरोना संदर्भात स्वॅबचे नमुने तपासणी करण्यासाठी सांगितले. त्यावरून ते खांमगाव रुग्णालयात गेले आणि तेथे दोघांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी आज (सोमवार) एकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 10 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्ण आढळेला परिसर कंटेनमेंट झोनमध्ये टाकून सील करण्यात आला आहे.