बुलडाण्यात 4 नवे 'पॉझिटिव्ह'; तर, निगेटिव्ह अहवाल आलेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह - corona in buldana
काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच आज आणखी चार जणांची त्यात भर पडली आहे. यामध्ये तीन मलकापूर तालुक्यातील असून एकजण मुख्य शहरातील आहे.
बुलडाणा - काही दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णांच्या संख्येत घट होत असतानाच आज आणखी चार जणांची त्यात भर पडली आहे. यामध्ये तीन मलकापूर तालुक्यातील असून एकजण मुख्य शहरातील आहे. हा रुग्ण दिल्लीतील तबलिगी मरकझ येथे गेला होता. संबंधित व्यक्तीचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र पुन्हा करण्यात आलेल्या तपासणीत त्याचे रिपोर्ट्स पोझिटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्यात एकूण २१ पॉझिटिव्ह झाले आहेत.
या सर्वांच्या संपर्कात आलेल्याची पुन्हा तपासणी करण्यात आली असून अन्य 57 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठण्यात आले. त्यातून आज 54 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 50 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर चौघांचे पॉझिटिव्ह आले आहेत.