महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात आढळले नवे 64 रुग्ण; तर 4 रुग्णांची कोरोनावर मात - buldhana corona report

मेहकर तालुक्यातील वडगाव माळी येथील 35, 54, 30, 71, 29, 35 व 55 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळला आहे. तसेच डोणगाव येथे 52 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी व 28 वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे.

बुलडाणा कोरोना अपडेट
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jul 15, 2020, 11:50 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. मंगळवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 366 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 302 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले असून तब्बल 64 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 556पर्यंत पोहचली आहे. प्राप्त झालेल्या कोरोनाबाधित अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 13 व रॅपिड टेस्टमधील 51 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 29 तर रॅपिड टेस्टमधील 273 अहवालांचा समावेश आहे.

मेहकर तालुक्यातील वडगाव माळी येथील 35, 54, 30, 71, 29, 35 व 55 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित आढळला आहे. तसेच डोणगाव येथे 52 वर्षीय महिला, 3 वर्षीय मुलगी व 28 वर्षीय पुरूषाला कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाबधितांमध्ये डोंगरखंडाळा येथील 33 वर्षीय पुरूष, बुलडाणा येथील 55 वर्षीय महिला, खामगावमधील रेखा प्लॉट येथील 30 व 45 वर्षीय पुरूष, 8 वर्षीय मुलगा, 38 वर्षीय महिला, जुना फैल येथील 56 व 40 वर्षीय महिला, नवा फैलमधील 63, 17, 55 वर्षीय महिला, 75, 80 व 74 वर्षीय पुरूष, कोठारी प्लॉट येथील 27 व 81 वर्षीय पुरूष, बाळापूर फैल येथील 20, 19, 30, 25 व 27 वर्षीय पुरूष, तसेच शिवाजी नगर येथील 46 व 42 वर्षीय महिला, जलालपुरा येथील 52 वर्षीय महिला, शेगावमधील 80 वर्षीय पुरूष, 74 वर्षीय महिला, एसबीआय कॉलनीमधील 26 वर्षीय महिला, लोहारा येथील 28 वर्षीय पुरूष, उमेश नगर येथील 24 वर्षीय महिला, रॉक नगरमधील 27 वर्षीय पुरूष, चारमोरी येथील 40 वर्षीय पुरूष, मलकापूरातील लख्खानी चौक येथील 17, 39 वर्षीय पुरूष, 39 व 20 वर्षीय महिला, तर चिखलीतील आनंद नगर येथील 32 व 30 वर्षीय पुरूष, दे. राजा येथील अहिंसा मार्गमध्ये 51, 52, 28, 25, 22 व 75 वर्षीय पुरूष, तर जळगाव जामोद येथे 70 वर्षीय दोन व्यक्ती, 65, 51, 40 वर्षीय पुरूष, 13, 51, 36 व 45 वर्षीय महिला, या रुग्णांचा समावेश आहे.

शिवाय, मंगळवारी 4 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये टिळक मैदान खामगांव येथील 45 वर्षीय पुरूष, खामगांव येथील 21 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40 वर्षीय पुरूष व बारादरी मलकापूर येथील 32 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे.

आजपर्यंत 5 हजार 28 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 272 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 42 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. एकूण 556 कोरोनाबाधित रूग्ण असून सध्या रूग्णालयात 267 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 17 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details