महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात नव्या 48 रुग्णांची नोंद ; तर दोघांचा मृत्यू - buldana corona report

जिल्ह्यात बुधवारी नव्या 48 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 834 पर्यंत पोहचला आहे.

बुलडाणा कोरोना अपडेट
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jul 23, 2020, 7:25 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असून बुधवारी नव्या 48 कोरोनाबाधितची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 834 पर्यंत पोहचला आहे. त्याचप्रमाणे दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 256 अहवालापैकी 208 अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.

नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये प्रयोगशाळेतील 47 व रॅपिड टेस्टमधील 1 अहवालाचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 165 तर रॅपिड टेस्टमधील 43 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 208 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवालामध्ये - खामगावमधील दोषीनगर (50 वर्षीय पुरूष), शंकर नगर (48, 24, 20 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला), भुसारी गल्ली (55 वर्षीय महिला), महावीर चौक (22, 31 व 50 वर्षीय महिला, 39 व 3 वर्षीय पुरूष), कृष्णपुरा सोसायटी (70 वर्षीय पुरूष), पुरवार गल्ली (44 वर्षीय पुरूष), सुटाळा (52 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरूष), वाडी (13 वर्षीय पुरूष, 41 वर्षीय महिला)

शेगांवमधील कोरोनाबाधित (37 वर्षीय पुरूष, 64 वर्षीय महिला), बालाजी फैल (69 वर्षीय पुरूष) नांदुरामधील कोरोनाबाधित (38 व 33 वर्षीय पुरूष), कृष्णा नगर (18 वर्षीय पुरूष), नांदुरा खुर्द (59, 57, 60 वर्षीय पुरूष, 55 व 48 वर्षीय महिला), गैबा नगर (55 वर्षीय पुरूष), सिंधी कॉलनी (32 वर्षीय पुरूष) , चिखली (66 वर्षीय पुरूष, 25 वर्षीय महिला), कालिंका मंदीराजवळ (40 व 20 वर्षीय महिला), शिवाजी नगर (69 वर्षीय पुरूष), पोलीस स्टेशनजवळ (43 वर्षीय महिला), आदर्श शाळेजवळ (2 वर्षीय मुलगा), बुलडाणा (30 वर्षीय महिला), धाड (22 वर्षीय महिला), डोणगांव मेहकर (22 वर्षीय पुरूष), जळगांव जामोद (36, 35 व 58 वर्षीय महिला, 57, 79 व 5 वर्षीय पुरूष), दे. राजा (65 व 32 वर्षीय पुरूष) या व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.

शिवाय, बुधवारी दोन रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये खामगांव येथील 57 वर्षीय पुरूष व अहिंसा मार्ग, दे. राजा येथील 55 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे. तर 6 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे - नांदुरा (75 वर्षीय पुरूष), ओम नगर (40 वर्षीय महिला), माळीपुरा (51, 34 वर्षीय पुरूष), चिखली (माळीपुरा 26 वर्षीय पुरूष), मलकापूर लक्ष्मी चौक (47 वर्षीय पुरूष), बुलडाणा मुठ्ठे लेआऊट 32 वर्षीय पुरूष रूग्ण अकोला येथे रेफर करण्यात आला आहे.

आतापर्यंत 6 हजार 475 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे 437 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तर 252 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यात सध्या 834 कोरोनाबाधित रूग्ण असून 373 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 24 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details