महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रवादीने 'तो' दिलेला शब्द पाळावा; स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांनी करुन दिली आठवण - विधान परिषद निवडणूक

ठरल्याप्रमाणे जर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला शब्द पाळला, तर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनाच विधान परिषदेवर घ्यावे; अशीच आमची आग्रही मागणी असेल, असेही रवीकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

ravikant tupkar buldhana
रविकांत तुपकर

By

Published : May 6, 2020, 8:27 PM IST

बुलडाणा -लोकसभा निवडणुकीच्या वेळी बुलडाण्यातील लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात विधान परिषदेची जागा देऊ, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रसने दिला होता. त्याची आठवण आपण करुन देत आहोत, असे स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. तसेच 'महाविकास आघाडीत मागे ठरल्याप्रमाणे स्वाभिमानी शेतकरी पक्षाला राष्ट्रवादीने विधान परिषदेवर संधी द्यावी. याबाबतचे पत्र आपण अध्यक्ष शरद पवार यांना लिहिले आहे' असेही तुपकर यानी म्हटले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया...

राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेची जागा स्वाभिमानीला द्यावी

लोकसभा निवडणुकीमध्ये बुलडाण्यातील स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे देखील निवडणुकीसाठी तयारीत होते. मात्र, निवडणुकीच्या दरम्यान चर्चांच्या अनेक फेरी झाल्या. त्यामध्ये निर्णायक टप्प्यावर बुलडाणा लोकसभेची जागा स्वाभिमानीने सोडावी. त्या बदल्यात त्यांना विधान परिषदेसाठी संधी देऊ, असा शब्द राष्ट्रवादीने दिला असल्याची आठवण तुपकर यांनी करुन दिली. तसेच राष्ट्रवादीने हा शब्द पाळावा, असही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा...शासनासोबत चर्चा करुनच आषाढी वारी - सोहळा प्रमुख

...आणि त्या जागेवर राजू शेट्टीच असावेत

स्वाभिमानीला राष्ट्रवादीने विधान परिषदेची जागा दिल्यास या जागेवर कोण निवडले जाईल, हे पक्षाचे नेते राजू शेट्टी ठरवतील. मात्र, ठरल्याप्रमाणे जर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला शब्द पाळला, तर राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणारे स्वाभिमानी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनाच विधान परिषदेवर घ्यावे; अशीच आमची आग्रही मागणी असेल, असेही रवीकांत तुपकर यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details