महाराष्ट्र

maharashtra

कर्मयोगी शिवशंकरभाऊंना पद्मविभूषण घोषित करावा, शरद पवारांद्वारे पंतप्रधानांकडे मागणी लावून धरणार

By

Published : Aug 8, 2021, 7:31 PM IST

श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केली.

buldana
buldana

बुलडाणा -श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे अध्यात्मिक क्षेत्रात व सेवा कार्यात असलेले कार्य बघता त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी केली. ते शेगाव येथे आज (8 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मागणी लावून धरली जाईल, असेही काझी यांनी म्हटले.

ॲड. नाझेर काझी

ॲड.नाझेर काझी यांनी आज शिवशंकरभाऊ पाटील यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तसेच भाऊंचे ज्येष्ठ सुपुत्र निळकंठ दादा पाटील, श्रीकांत दादा पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यांनतर विश्रामभवनात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, की 'शिवशंकरभाऊ यांचे कार्य केवळ सेवेपुरते मर्यादित नव्हते. तर त्यांनी संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या सेवा कार्याचा संदेश पोहोचवला. त्यांच्या कर्तृत्वाची दखल परराष्ट्रामध्ये सुद्धा घेण्यात आली आहे. अशा श्रेष्ठ कार्य केलेल्या कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना भारत सरकारने सर्वाधिक प्रतिष्ठेचा असलेला पद्मविभूषण पुरस्कार घोषित करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा. यासाठी शरद पवार यांच्या मार्फत पंतप्रधानांकडेही ही मागणी लावूव धरली जाईल'.

बुधवारी शिवशंकरभाऊंचे निधन

ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून नि:स्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे बुधवारी 4 ऑगस्ट 2021 रोजी निधन झाले. त्यांची प्रकृती मागील तीन-चार दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे अत्यवस्थ झाली होती.

उपाचारास नकार

कुठल्याही रुग्णालयात दाखल होण्यास त्यांनी नकार दिल्याने त्यांच्या सूचनेनुसार घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या मार्गदर्शनात पूर्ण मेडिकल सेट-अपसह ट्रिटमेंट करण्यात येत होती. 3 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला होता. मेडिकल टीमने शर्थीचे प्रयत्न केले होते, मात्र त्यांना यश मिळाले नाही. 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी भाऊंनी अखेरचा श्वास घेतला.

हेही वाचा -Pune Unlock : पुणेकरांसाठी खुशखबर! विकेंड लॉकडाऊनही नाही

ABOUT THE AUTHOR

...view details