बुलडाणा - खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात. त्यांना असे बोलण्यची सवय आहे. असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केला आहे. श्री गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक शिवशंकरभाऊ पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या घरी सांत्वनपर भेट देण्यासाठी ठाकूर शेगावला आल्या होत्या. त्यावेळी बुलडाणा येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
नवनीत राणांना नेहमी वायफळ बोलायची सवय -यशोमती ठाकूर - बुलडाणा जिल्हा
खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात. त्यांना असे बोलण्यची सवय आहे. असे बोलून आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. त्या बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलत होत्या.
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी जिल्ह्यातील आदिवासी बालकांचे कुपोषण या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर ठाकूर यांनी वरील उत्त दिले आहे. दरम्यान, आपण खासदार नवनीत राणा यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहितीही ठाकूर यांनी यावेळी दिली आहे.