महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेगावात आट्या-पाट्याची राष्ट्रीय स्पर्धा; देशभरातील २० राज्यातून खेळाडू दाखल - National Atya-Patya Championship compitition buldana

दरवर्षी प्रमाणे शेगावात राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे आयोजन राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डि. व्हि. पाटील महाराष्ट्र महासचिव डॉ. दिपक कविश्वर डॉ. अमरकांत चकोले, पुनम कुमार, वसिमराजा, जय कविश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनाचा सामना बिहार आणि छत्तीसगड पुरुष मधे रंगला. स्पर्धेसाठी एकूण २० राज्यांतील महिला-पुरुषांच्या ४० संघांनी सहभाग घेतला आहे.

National Atya-Patya Championship compitition  begins in buldana
शेगावात राष्ट्रीयस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धा; देशभरातील २० राज्यातून खेळाडू दाखल

By

Published : Dec 14, 2019, 7:54 AM IST

बुलडाणा - राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनच्या वतीने शेगाव मध्ये शुक्रवारी राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे उद्घाटन झाले. या स्पर्धेत २० राज्यातून महिला आणि पुरुष संघ दाखल झाले आहे. पुढील 3 दिवस शहरात रात्रीच्या वेळेस आट्या-पाट्या स्पर्धेचा थरार चालणार आहे.

दरवर्षी प्रमाणे शेगावात राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे आयोजन राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डि. व्ही. पाटील महाराष्ट्र महासचिव डॉ. दिपक कविश्वर डॉ. अमरकांत चकोले, पुनम कुमार, वसिमराजा, जय कविश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन झाले. उद्घाटनाचा सामना बिहार आणि छत्तीसगड पुरुष मधे रंगला. स्पर्धेसाठी एकूण २० राज्यांतील महिला-पुरुषांच्या ४० संघांनी सहभाग घेतला आहे. हे संघ 6 विभागात विभागले आहेत. एका विभागात 6 संघ आहेत. त्यांच्या लिग नॉक आउट मॅचेस होणार आहेत. एकूण ६० मॅचेस होणार आहेत. १३ ते १५ डिसेंबर पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहेत. स्व. गजाननदादा पाटील मार्कट यार्ड याठिकाणी या मॅचेस होत आहेत.

राष्ट्रीय स्तरावरील मॅचेसमध्ये महाराष्ट्राच्या संघात जिल्ह्यातील जगदिप बनकर आणि श्वेता देशमुख या 2 खेळाडूंची निवड झाली आहे. राज्यस्तरीय मॅचेस आणि निवड चाचणी उस्मानाबाद येथे झाली होती.

हेही वाचा - रोहित 'ला लीगा फुटबॉल स्पर्धे'चा ब्रँड अ‌ॅम्बेसेडर, 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं

या राज्यांचा स्पर्धेत सहभाग -

महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, झारखंड, मणिपूर, बिहार, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पॉन्डेचेरी, चंदिगड, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मिर, गोवा, केरळ, उत्तरप्रदेश, हरियाणा, ओडिशा, गुजरात, तामिळनाडू, दादरा एन एच.

हेही वाचा -मैदानात पंचांशी हुज्जत, मुरली विजयला झाला दंड

देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्पर्धा आवश्यक -

आट्या पाट्या हा खेळ सर्वच ठिकाणी लोकप्रिय आहे. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे खेळाडूंना विविध राज्यात खेळण्याची संधी मिळते. विचार, संस्कृतीचे आदान-प्रदान होऊन विविध राज्यातील माहिती होते. त्यामुळे देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्पर्धा आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. संजय कुटे यांनी येथे केले. कुटे यांनी स्पर्धेला भेट दिली.

आमदार डॉ. संजय कुटे यांनी याठिकाणी भेट दिली.

सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे - डॉ. कविश्वर

महाराष्ट्र राज्य शासनाच्या नोकरी मधे २०१६ पर्यंत आट्यापाट्या खेळाच्या राष्ट्रीय स्तरावरील खेळाडुला ५% आरक्षण होते. मात्र, नंतर हे आरक्षण काढून टाकण्यात आले. जर कबड्डी, बुद्धीबळ खो-खो इत्यादी खेळांना हे आरक्षण मिळते तर मैदानी पुरातन आट्यापाट्या खेळाला सरकारी नोकरीत आरक्षण का नाही? असा सवाल फेडरेशनचे राज्यस्थरीय महासचिव डॉ. दिपक कविश्वर यांनी यावेळी केला. तसेच ते आरक्षण मिळावे यासाठी फेडरेशन सतत प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details