बुलडाणा- गेल्या तीन वर्षांपूर्वी एका संस्थेकडून सहकार क्षेत्रातील व्यवस्थापकांसाठी असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी काठमांडू येथे गेलेले बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मनसेचे अमरावती विभाग संघटक विठ्ठल लोखंडकार यांचा हा नेपाळ दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. दौऱ्याचा विमान तिकीट धनादेश लोखंडकार यांच्या पत्नीच्या नावे आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. यावर प्रश्नही उपस्थित करत नंदलाल भट्टड यांनी चौकशीची मागणी केली आहे.
विठ्ठल लोखंडकारांचा काठमांडू दौरा चर्चेत; विमान तिकीटाचे बिल पत्नीच्या नावे, चौकशीची मागणी - विठ्ठल लोखंडकार
विठ्ठल लोखंडकार हे ४ ते ६ जानेवारी २०१७ दरम्यान काठमांडू येथे गेले होते. मात्र, विमान प्रवासाचा धनादेश त्यांच्या पत्नीच्या नावे निघाल्याचे समोर आले. त्यामुळे विमान प्रवासाचा धनादेश विठ्ठल लोखंडकार यांच्या पत्नीच्या नावे कसा? असा प्रश्न करत मनसेचे माजी शहरप्रमुख नंदलाल भट्टड यांनी तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.
तीन वर्षांपूर्वी धनंजयराव गाडगीळ सहकार प्रबंधक संस्थानकडून सहकार अध्यक्ष, संचालक व व्यवस्थापकांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रमाचे नेपाळमधील काठमांडू येथे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मनसेचे अमरावती विभाग संघटक विठ्ठल लोखंडकार हे ४ ते ६ जानेवारी २०१७ दरम्यान काठमांडू येथे गेले होते. मात्र, विमान प्रवासाचा धनादेश त्यांच्या पत्नीच्या नावे निघाल्याचे समोर आले. त्यामुळे विमान प्रवासाचा धनादेश विठ्ठल लोखंडकार यांच्या पत्नीच्या नावे कसा? असा प्रश्न करत मनसेचे माजी शहरप्रमुख नंदलाल भट्टड यांनी तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, अभ्यास दौऱ्यावर गेल्यानंतर तश्या पद्धतीचा कुठलाच अहवाल सादर केला नसल्याने फक्त मौज मजा करण्यासाठीच शेतकऱ्यांच्या पैशाचा वापर होत असल्याचा आरोप भट्टड यांनी केला आहे. तशी तक्रार सहाय्यक निबंधक यांच्याकडे केली असून चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे तीन वर्षांपूर्वीचा हा काठमांडू दौरा शहरात चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.