बुलडाणा - भादोला या गांवात दिराने वहिणीला लाकडी दाड्यांने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुन्या वादातील चोरीची तक्रार दिल्यामुळे दिराने केला वहिणीचा खून केला. ही घटना आज (सोमवार) 28 डिसेंबर रोजी घडली. या प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी दिराच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजू चिंकाजी गवई (38 वर्ष) असे आरोपीचे नाव आहे.
चोरीच्या जुन्या तक्रारीवरून मारहाण-
चोरीची तक्रार दिल्यामुळे बुलडाण्यात दिराने केला वहिणीचा खून - crime rate in Buldana district
भादोला या गांवात दिराने वहिणीला लाकडी दाड्यांने मारहाण केली.
बुलडाणा तालुक्यातील भादोला येथील आरोपी राजू चिंकाजी गवई याने आपली वहिणी बेबी संतोष गवई (55 वर्ष) यांचा जुन्या चोरीची तक्रार दिल्यामुळे खून केला. आरोपीने काल 27 डिसेंबरच्या सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास लाकडी दांड्याने डोक्यात वार करून वहिणीला गंभीर जखमी केले होते.
औरंगाबाद येथे उपचारादरम्यान बेबी गवई यांचा मृत्यू-
बेबी संतोष गवई यांना बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान रात्री त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अगोदर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला होता. परंतु आज सोमवारी संतोष चिंकाजी गवई (68 वर्षे) यांच्या तक्रारीवर आरोपी राजू चिंकाजी गवई विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपी राजू गवई याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बबन रामपुरे व मोहम्मद शकील करत आहे.
हेही वााचा-नववर्षाच्या स्वागतासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर