बुलडाणा - एनआरसी आणि नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात एमआयएम पक्षाच्या वतीने जिल्हा कचेरीसमोर आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करत कायद्याची प्रत फाडून कार्यकर्त्यांनी आपला निषेध नोंदवला. एमआयएमचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंडन करून कापलेले केस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले.
#NRC आणि #CAA विरोधात एमआयएमचे बुलडाण्यात मुंडन आंदोलन हेही वाचा... फडणवीस सरकारमध्ये ६६ हजार कोटी रुपयांच्या कामात अफरातफर?
एमआयएम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येत असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. बुलडाणा जिल्हा कचेरीसमोर जिल्हाध्यक्ष शहेजाद खान यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कायद्याची प्रत फाडून आणि कार्यकर्त्यांनी मुंडन केल्यानंतर कापलेले केस पंतप्रधानांना पाठवण्यात आले. कायदा मागे घ्यावा यासाठी राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले.
हेही वाचा... CAA Protest : बीडमध्ये मोर्चाला हिंसक वळण; दगडफेकीत अनेक वाहनांची नासधूस