महाराष्ट्र

maharashtra

बुलडाणा : मुकुल वासनिक यांच्या सभेत राडा होण्याची शक्यता

By

Published : Oct 16, 2019, 12:40 PM IST

Updated : Oct 16, 2019, 12:50 PM IST

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक नेतेमंडळी इच्छुक होते. तर यावेळेस भारिप बहुजन महासंघामधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या सहकार क्षेत्रातील नेते प्रसेनजीत पाटील यांच्यासह डॉ. स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील, रमेश घोलप आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. अशा वेळेस प्रसेनजीत पाटील आणि स्वाती वाकेकर यांच्यापैकी एकाला तिकीट मिळणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र, शेवटच्या क्षणी डॉ. वाकेकर यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

मुकुल वासनिक

बुलडाणा- जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघातील प्रसेनजित पाटील यांच्या समर्थकांनी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांविरुद्ध बंड पुकारले आहे. प्रसेनजित पाटील यांना उमेदवारी नाकारून डॉ. स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. त्यामुळे 17 ऑक्टॉबरला काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांची सभा पाटील समर्थक सभा उधळून लावण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अनेक नेतेमंडळी इच्छुक होती. तर यावेळेस भारिप बहुजन महासंघामधून काँग्रेसमध्ये घरवापसी करणाऱ्या सहकार क्षेत्रातील नेते प्रसेनजीत पाटील यांच्यासह डॉ. स्वाती वाकेकर, प्रकाश पाटील, रमेश घोलप आदींनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. अशा वेळेस प्रसेनजीत पाटील आणि स्वाती वाकेकर यांच्यापैकी एकाला तिकीट मिळणार यावर शिक्कामोर्तब झाला होता. मात्र, शेवटच्या क्षणी डॉ. वाकेकर यांनी उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पाटील यांचे कार्यकर्ते नाराज आहेत.

हेही वाचा -विकासकामांचे फक्त फलकच... अलमपूर गाव अजूनही विकासाच्या प्रतीक्षेत

मंगळवारी सायंकाळी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा या गावामध्ये वाकेकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांसह परिसरातील नेते व कार्यकर्ते मंडळी उपस्थित होते. यावेळी बैठक सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी बैठकीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांना प्रसेनजित पाटील यांच्या कापलेल्या उमेदवारी प्रश्न केले. यावेळी अंभोरे यांनी कार्यकर्त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आणखी भडकले.

त्यामुळे हे प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक गुरुवारी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये जळगाव जामोद आणि खामगाव विधानसभा मतदारसंघात ते प्रचार सभेला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, जळगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षश्रेष्ठींनी विशेषता मुकुल वासनिक यांनी विजय अंभोरे यांच्यामार्फत पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तसा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय पाटील समर्थकांनी फेसबुक, व्हाट्सअपवरही याबाबतचे आरोप केले आहेत. त्यामुळे या सभेत राडा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - 'त्या' शेतकऱ्याची आत्महत्या गृहकलहातून, पोलीस तपासात निष्पन्न

दरम्यान, वासनिक जळगाव-जामोद विधानसभा मतदारसंघाचा दौरा रद्द करणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, असे न झाल्यास वासनिक यांच्याविरुद्ध प्रचंड नारेबाजी किंवा त्यांना कार्यकर्ते काळे झेंडे दाखवणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

Last Updated : Oct 16, 2019, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details