बुलडाणा -बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे आज माँ जिजाऊंची ४२५ वी जयंती ( Jijau birth festival ) मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात होत आहे. मासाहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी सुप्रिया सुळे सिंदखेड राजा येथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. आजच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आले असते तर बर वाटले असते अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली.
जनतेसाठी शिंदे सरकारकडे वेळ नाही -शिंदे फडणवीस सरकारकडे जनतेसाठी वेळ नसून ते त्यांच्या कामातच व्यस्त आहे अशी, टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तसेच शिंदे फडणवीस सरकारला ईडी सरकार म्हटलेले आवडते असा हल्लाबोल त्यांनी शिंदे यांच्यावर केला.
शिंदे सरकारचे विकासकामांकडे दुर्लक्ष -माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंहखेडराजा येथे येऊन येथील विकासकामांचा आराखडा तयार केला. मात्र, सहा महिन्यांपूर्वी सरकार गेल्यापासून ते काम रखडले आहे. सध्याच्या सरकारने विकास आराखड्याकडे दुर्लक्ष केल्याचेही त्यांनी नमूद केले.