मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते, आमदार सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असले तरी, शिंदे गटातील एका खासदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यात खासदार प्रतापराव जाधव ( MP Prataprao Jadhav ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
MP Prataprav Jadhav : 'ठाकरे गटाचे आमदार रात्री मुख्यमंत्र्यांना भेटतात'.. शिंदे गटाच्या खासदारांचा गौप्यस्फोट - प्रतापराव जाधव
महाराष्ट्राच्या राजकारणात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसत आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मोठे बदल होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते, आमदार सातत्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असले तरी, शिंदे गटातील एका खासदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यात खासदार प्रतापराव जाधव ( MP Prataprao Jadhav ) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
काय म्हणाले प्रतापराव जाधव - जाधव म्हणाले की, "काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह उद्धव ठाकरे गटातील 14-15 आमदार रात्री अपरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतात. त्यासोबतच या आमदारांचा आमच्या शिंदे गटातील मंत्र्यांसोबत बैठकाही सुरू असतात. हे मी स्वतः पाहिले असून हे आमदार सतत आमच्या संपर्कात आहेत." असा मोठा गौप्यस्फोट खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
शिंदे गटात इनकमिंग - ठाकरे गटाचे सर्व आमदार आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे काही आमदार नाराज आहेत. हे सर्व लोक लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. खासदार प्रतापराव जाधव यांनी आगामी निवडणुकीपूर्वी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान, सोयाबीनच्या दरातही वाढ झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. केंद्र सरकारने सोयाबीनसह तेलबियांवरील निर्बंध उठवल्यामुळे सोयाबीनचे भाव वाढत आहेत. याचा फायदा सोयाबीन शेतकऱ्यांना होणार असल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.