खासदार प्रतापराव जाधव पत्रकार परिषदेत बोलताना बुलढाणा: केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावाबद्दल दिलेल्या निकालावरून दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्योरोप केले जात आहेत. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेतील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते बुलढाण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
संजय राऊतांवर टीका: खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, खासदार संजय राऊत यांचे गणित कच्चे आहे. त्यांना आरोपच करायचे होते तर त्यांनी तीनशे खोक्यांचे करायला पाहिजे होते. कारण एक खासदार सहा आमदारांचे प्रतिनिधित्व करतो हे सगळे हास्यस्पद असून ते उद्धव ठाकरे यांच्याकडून पैसे घेऊन आरोप करतात.
राऊत खरे बोलतात की खोटे?: खासदार जाधव पुढे म्हणाले की, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाआधी संजय राऊत न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असल्याचे म्हणत होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच आता आरोप केले. त्यामुळे संजय राऊत यांनी स्वतः स्पष्ट करावे की, सकाळी खरे बोलत होते का संध्याकाळी खोटे बोलत होते ? असा प्रश्न त्यांनी संजय राऊत यांना केला. तसेच एकनाथ शिंदे यांची ताकद ओळखण्यासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कमी पडलेत. म्हणून त्यांच्यावर आज लाचारीचे दिवस आलेत, असेही ते म्हणाले आहेत. शिवसेना हे चार शब्द ज्याच्याकडे आहे त्याकडेच बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत त्यांना मानणारे कार्यकर्ते जातील. त्यामुळे शिवसेना कुणाची हा प्रश्न संपला असल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय राऊतांचे आरोप: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय घेतला. यातून सावरण्यासाठी त्यांना आता बराच अवधी जाणार असल्याचे सांगितले जाते. परंतु या दरम्यान आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाने हा निर्णय देताना पक्षपातीपणा केल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला गेला आहे. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत २ हजार कोटी रुपयांचा सौदा आणि व्यवहार झाले असल्याचा खळबळजनक आरोप केला. इतकेच नाही तर याबाबत माझी खात्रीची माहिती असल्याचही त्यांनी सांगितले आहे. तसेच हा प्राथमिक आकडा असून हे शंभर टक्के सत्य असल्याचेही ते म्हणाले आहेत. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील, देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
हेही वाचा:Kirit Somaiya on Sanjay Raut : कोर्टात अपील करताना संजय राऊत २ हजार कोटींच्या दाव्याचा उल्लेख करणार का? किरीट सोमैय्यांचा सवाल