महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडकरींच्या स्वप्नाला हरताळ फासला, खासदार प्रतापराव जाधवांचा अधिकाऱ्यांवर आरोप - MP PRATAPRAO JADHAV

बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव रस्ता बनवणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरवर जोरदार टीका करत आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचे आभार मानत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरवर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला आहे. नितीन गडकरीं यांनी दर्जेदार रस्ते व्हावेत म्हणून मोठ्या प्रमाणात बजेट उपलब्ध करून दिले , मात्र दुर्दैवाने अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरांनी संगनमत करून गडकरींच्या स्वप्नाला हरताळ फासला, असे ते म्हणाले.

खासदार प्रतापराव जाधवांचा अधिकाऱ्यांवर आरोप
खासदार प्रतापराव जाधवांचा अधिकाऱ्यांवर आरोप

By

Published : Jan 17, 2021, 4:51 PM IST

बुलडाणा - बुलडाण्याचे शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव रस्ता बनवणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरवर जोरदार टीका करत आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींचे आभार मानत अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरवर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला आहे. नितीन गडकरीं यांनी दर्जेदार रस्ते व्हावेत म्हणून मोठ्या प्रमाणात बजेट उपलब्ध करून दिले , मात्र दुर्दैवाने अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरांनी संगनमत करून गडकरींच्या स्वप्नाला हरताळ फासला, असे ते म्हणाले. ईटीव्ही भारतने 10 जानेवारीला चिखली-मेहकर राष्ट्रीय सिमेंट महामार्ग सुरू होण्याच्या एक वर्षाच्या आतच महामार्गावर लांब मोठे तडे गेले आहेत व खड्डे पडल्याची वास्तव्याची बातमी समोर आणली होती.त्याची दखल घेत खासदार प्रतापराव जाधवांनी हे वक्तव्य केले आहे.

खासदार प्रतापराव जाधवांचा अधिकाऱ्यांवर आरोप

गुणवत्तेची घेतली होती हमी
चिखली-मेहकर 39 किलोमीटरचा सिमेंट-काँक्रीट राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 पीसी हा महामार्ग 203 कोटी रुपयांत तयार करण्यात आला. मार्च 2020 मध्ये या रस्त्याला सुरू करण्यात आले. रस्ता तयार करताना त्याची गुणवत्ता चांगल्या दर्जाची असल्याची खात्री सगळ्यांनाच होती. कारण केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या माहामार्गांच्या गुणवत्तेची हमी घेतली होती. राष्ट्रीय महामार्ग तयार करताना आमच्या खात्यात शंभर टक्के पारदर्शकता आहे. भष्ट्राचार नाही, म्हणून गुणवत्तेमध्ये तडजोड करणार नाही, जे कोणी कंत्राटदार गुणवत्तेनुसार काम करणार नाही, अशा कंत्राटदाराला बुलडोझर खाली टाकणार, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्यांची ही हमी फोल ठरली आहे. चिखली-मेहकर राष्ट्रीय सिमेंट महामार्ग सुरू होण्याच्या एक वर्षाच्या आतच महामार्गावरील मुंगसरी, खैरव फाट्याजवळील रस्त्याला लांब मोठे तडे गेले आहेत व खड्डे पडले आहेत, अशी बातमी प्रकाशित करून चिखली-मेहकर रस्त्याची वास्तविकता समोर आणली होती. याची दखल घेत खासदार प्रतापराव जाधव यांनी नॅशनल हायवेवर नेमलेले इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टर यांनी संगमत करून जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग निकृष्ट दर्जाचे तयार केल्याचे वक्तव्य केले.

रस्त्यातील तडे व खड्ड्याची मलम पट्टी
या रस्त्याची पाच वर्षापर्यत गॅरंटी कंत्राटदार यांच्याकडे आहे. ही गोष्ट खरी आहे मात्र पाच वर्ष पूर्ण होण्याआधीच अनेक ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहे. कंत्राटदार आणि अधिकारी हे लोक तात्पुरत्या स्वरूपात डागडुज्जी करत आहेत. इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर आणि विभागातील काही अधिकारी यांच्या संगतमताने या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली.

हेही वाचा -बेळगावला जाणाऱ्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांना कर्नाटक पोलिसांनी रोखले

ABOUT THE AUTHOR

...view details