बुलडाणा- जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मंगरूळ (ईसरुळ) येथे आज दुपारी मन हेलावणारी घटना घडली. एका मातेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वैशाली जितेंद्र बोर्डे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. तर मुलगा ओमकार (वय 8) व मुलगी छकुली (6) अशी चिमुकल्यांची नावे आहेत.
हेही वाचा - औरंगाबाद भूसंपादन उपजिल्हाधिकाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
याबाबत अधिक माहिती अशी, की सध्या दिवाळीची लगबग सुरू असल्याने माहेरी जाण्यावरून वैशालीचे पती जितेंद्र लक्ष्मण बोर्डेसोबत भांडण झाले होते. त्यामुळे पत्नी वैशालीने रागाच्या भरात मंगरूळ शिवारातील आपल्या चुलत सासऱ्याच्या विहिरीत दोन मुलांसह उडी मारली.
हेही वाचा - चोरीचा आरोप झाल्याने 12 वर्षीय मुलाची आत्महत्या
घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे व त्यांचे सहकारी झीने, साखरे, इंगळे, यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास साखरे करत आहेत.