महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा कोरोना अलर्ट : 2 नव्या कोरोनाबाधितांची वाढ, संख्या पोहोचली ९२ वर

प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे शेगाव येथील 30 वर्षीय पुरुष आणि बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरुष रुग्णाचा आहे. आत्तापर्यंत 1,568 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 92 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

बुलडाणा कोरोना अलर्ट
बुलडाणा कोरोना अलर्ट

By

Published : Jun 9, 2020, 10:41 PM IST

बुलडाणा - प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या स्वॅब नमुन्यांच्या अहवालांपैकी गुरुवारी (9 जून) 28 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 26 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 02 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे शेगाव येथील 30 वर्षीय पुरुष आणि बुलडाणा येथील 36 वर्षीय पुरुष रुग्णाचा आहे. आत्तापर्यंत 1,568 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 92 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 64 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 25 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 51 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details