बुलडाणा- चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजी खेळात लेडी सिंघम मोनाली हर्षचंद्र जाधव हिने विक्रमी कामगिरी केली. रविवारी तिचे प्रशिक्षकासह बुलडाणा येथे आगमन झाले. आगमन होताच तिचा भव्य सत्कार करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. शेगाव तालुक्यातील जलंब पोलीस स्टेशनमध्ये मोनाली जाधव कार्यरत आहे.
विश्वविजेत्या मोनालीचे बुलडाण्यात जंगी स्वागत; चीनमधील जागतिक क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी - जलंब पोलीस स्टेशन
महाराष्ट्रातील पोलीस दलाचे नेतृत्व मोनाली जाधव यांच्याकडे होते. हिने स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवली. त्यामुळे देशासह बुलडाणा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. रविवारी ती मार्गदर्शक चंद्रकांत ईलग यांच्यासह बुलडाणा येथे दाखल झाली.

चीनमध्ये नुकतीच जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्रातील पोलीस दलाचे नेतृत्व मोनाली जाधव यांच्याकडे होते. हिने स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी करत दोन सुवर्ण आणि एक कांस्य पदक मिळवली. त्यामुळे देशासह बुलडाणा जिल्ह्याच्या लौकिकात भर पडली असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. रविवारी ती मार्गदर्शक चंद्रकांत ईलग यांच्यासह बुलडाणा येथे दाखल झाली. बुलडाणा बस स्थानकावर आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तसेच महिलांनी मोनालीला ओवाळून हार फूलांनी स्वागत केले.
दरम्यान विजय रथातून शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. चौका चौकात विविध संघटनांकडून व पोलीस दलांकडून मोनालीचे हार फूलांनी स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी द्रोणाचार्य आर्चेरी अकादमीचे पदाधिकारी, खेळाडू, तसेच सर्व खेळाडूंचे पालकवर्ग व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोनालीने टार्गेट आर्चेरीमध्ये ७२० पैकी ७१६ गूण मिळवले. शिवाय दोन सुवर्ण व एक कास्य पदक पटकावले आहे.