महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MNS Protest : राज्यपालांविरोधात मनसेचे जोडे मारो आंदोलन - विठ्ठल लोखंडकार

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केला. त्याचा निषेध म्हणून खामगाव येथे मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.

MNS
राज्यपालांविरोधात मनसेचं जोडे मारो आंदोलनं

By

Published : Nov 20, 2022, 9:56 PM IST

बुलडाणा:राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केला. त्याचा निषेध म्हणून खामगाव येथे मनसे नेते विठ्ठल लोखंडकार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्यपाल यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करत त्यांचे पोस्टर जाळून निषेध व्यक्त केला गेला. तर राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.

राज्यपालांविरोधात मनसेचं जोडे मारो आंदोलनं

भारतीय जनता पक्ष व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari on shivaji maharaj) हे महापुरुषांचा सातत्याने अपमान करत आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपतींबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा अशी मागणी जोर धरत आहे.

काय म्हणाले राज्यपाल- दरम्यान, राज्यपाल सातत्याने अशी विधाने करत असल्याने राज्यात सर्वदुर संतापाची लाट उसळली आहे. राजकीय क्षेत्रातुन राज्यपालांवर सडकुन टिका केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श असल्याचे विधान राज्यपाल यांनी केल आहे. यावरून राज्यात मोठा वादंग निर्माण झालेला आहे. राज्यपाल आणि भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बेताल वक्तव्यं केली जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details