बुलडाणा : वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
घरगुती वीज ग्राहकांना अव्वाची सव्वा बिले देण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याविरोधात आज बुलडाण्यात मनसेच्यावतीने मोर्च्याचे आयोजन करण्यात आले.
बुलडाणा : वाढीव वीजबिला विरोधात मनसे आक्रमक; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
बुलडाणा -लॉकडाऊन काळात मनमानी वीजबिल देऊन अख्खा महाराष्ट्र लुटण्याचे काम वीजवितरण कंपनीच्या माध्यमातून शासनाने केले आहे. होते. मात्र, पोलिसांनी मोर्च्याला परवानगी नाकारल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसैनिकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत जनतेची वीजबिल माफ करा, अशी मागणी करण्यात आली. तर लवकरात लवकर वीजबिल माफ केली नाही, तर मनसेस्टाईलने आंदोलन कण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.