महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वारिस पठाणांवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली, म्हणाले.. - waris pathan statement

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे. गायकवाड हे मलकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात शनिवारी बोलत होते.

waris pathan statement
वारीस पठाणांवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली, म्हणाले..

By

Published : Feb 23, 2020, 3:19 PM IST

Updated : Feb 23, 2020, 3:31 PM IST

बुलडाणा -एमआयएमचे नेते तथा माजी आमदार वारिस पठाण यांच्या वादग्रस्त विधानानंतर संपूर्ण देशातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मात्र, बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. गायकवाड यांनी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

वारिस पठाणांवर टीका करताना शिवसेना आमदाराची जीभ घसरली, म्हणाले..

हेही वाचा -वारिस पठाण यांच्या 'त्या' वक्तव्याने राजकीय वातावरण तापले

"आतापर्यंत तुम्ही तुमच्या बायका घरात ठेवल्या त्या बायकांना गुलाम बनवून ठेवलं, त्यांना कधी बाहेर येवू दिले नाही. त्यांना सांगितलं गेलं की आर्मी जवान येतील तुम्हाला घरातून बाहेर काढतील आणि देशाबाहेर हाकलतील, असं खोटं सांगून त्यांना बाहेर आणलं व त्यांना सांगितलं 15 कोटी मुसलमान 100 कोटी हिंदूवर भारी पडतील. तू विसरलास वारिस पठाण शिवरायांचे 500 मावळे तुझ्या लाखांच्या फौजेला चीत पाडायचे हे तू विसरलास. आजही शिवरायांची जमात या राज्यात जीवंत आहे. तू 15 कोटींची गोष्ट काय करतो. मी सोमवारी तुला विधानसभेत भेटतो." असे म्हणत आमदार गायकवाड यांनी पठाण यांना आव्हान दिले.

आमदार गायकवाड म्हणाले, तुझी जशी जीभ चालते तशी आमची तलवार चालते. ते मलकापूर तालुक्यातील जांभूळ धाबा येथील शिवजयंतीच्या कार्यक्रमात शनिवारी बोलत होते. या वादग्रस्त विधानाचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा -'माझे वक्तव्य हिंदू विरोधी नाही; हे राजकीय षडयंत्र'


Last Updated : Feb 23, 2020, 3:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details