बुलडाणा- लखीमपूर दुर्घटनेपासून लोकांची दिशाभूल करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यात ईडी, आयकर व एनसीबीमार्फत कारवाई केली जात आहे, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. लखीमपूर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला. शेतकरी या दबावाला न जुमानता आंदोलन सुरुच ठेवले. त्यानंतर त्यांच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घातले. यात आठ शेतकऱ्यांचा बळी गेला. या घटनेपासून देशातील नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच केंद्राकडून विविध संस्थांच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय केंद्र सरकार घेत नाही.
केंद्रात हत्यारे सरकार
लोकांची दिशाभूल करुन लखीमपूर येथील प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. पण, अमली पदार्थापेक्षा त्या आठ शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा नाही का, असा सवाल उपस्थित करत केंद्र सरकार हत्यारे सरकार आहे, असा अशी टाकाही यावेळी आमदार गायकवाड यांनी केली आहे.