महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेकाला जिल्हाधिकारीच जबाबदार, आमदार फुंडकर यांचा आरोप

जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या बंगल्यात अनेक सुविधा नियमबाह्य पध्दतीने उपलब्ध करून घेतल्या. याचे ऑडीट केले जावे, अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Jul 2, 2020, 5:49 PM IST

बुलडाणा- बुलडाण्याचे जिल्हाधिकारी कुणालाच सहकार्य करत नाहीत, जिल्ह्यातील अनेक बडे अधिकारी तणावात आहेत तसेच जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे जिल्हात कोरोना वाढतो, असा गंभीर आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार आकाश फुंडकर यांनी बुलडाण्याच्या खामगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्हाधिकारी सुमनचंद्रा आपल्या कार्यशैलीमुळे चर्चेत आले आहे. मागील काही दिवसा अगोदार चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी देखील जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्यावर आरोप केले होते.

बोलताना आमदार फुंडकर
कोरोनाच्या काळात आपल्यासह जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी स्थानिक विकास निधीतून निधी दिला. तर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात कोविड-19 साथरोगामध्ये तपासणीसाठी ‘ट्रू लॅब क्वाट्टरो’ मशीन उपलब्ध करुन देण्यासाठी अतिरिक्त 20 लाख रुपये दिलेत. मात्र, ही मशीन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी कोरोना आपातकालीन परिस्थितीत तीन महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतर जिल्ह्यातील रूग्णालयांमध्ये विविध सुविधा उपलब्ध नाहीत. जिल्ह्यातील नागरिकांना वाऱ्यावर सोडणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या बंगल्यात अनेक सुविधा नियमबाह्य पध्दतीने उपलब्ध करून घेतल्या. याचे ऑडीट केले जावे, अशी मागणी आमदार आकाश फुंडकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांच्यावर अशा प्रकारे आरोप पहिल्यांदा झाले असे, नाही. यापूर्वी देखील चिखलीच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी मका खरेदीसाठी केलेल्या आंदोलनावेळी जिल्हाधिकारी सुमनचंद्रा यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details