बुलडाणा -जिल्ह्यातील शेगांव येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 14 मार्चला उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी 13 मार्चला रात्री 11.30 च्या सुमारास घडली असल्याची माहिती शेगाव पोलिसांनी दिली आहे.
शेगावात अल्पवयीन प्रेमयुगलाची रेल्वे रुळावर आत्महत्या - Suicide on Railway Train in Shegaon
शेगांव येथील अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केल्याची घटना शनिवारी 14 मार्चला उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवारी 13 मार्चला रात्री 11.30 च्या सुमारास घडली असल्याची माहिती शेगाव पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव राम नामदास (वय 17) तर, तरुणीचे नाव राधिका करडे (वय 15 वर्ष) असे आहे. दोघेही शुक्रवारी 13 मार्चच्या संध्याकाळपासून घरातून गायब होते. नातेवाईकांनी शोधाशोध केली. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान शेगाव येथील रेल्वे रुळावर त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती 14 मार्चला उघडकीस आली.
ए.पी.आय सागर गोळे, पो. हे. कॉ. बाळु खिराडे, ज्योती खिराडे, पोलीस शिपाई अशांत चोरटे यांनी घटनास्थळी पोहचून मृतदेहाजवळील मोबाईलवरुन दोघांची ओळख पटवली. तसेच मोबाईल मधील नंबरवरून नातेवाईकांशी संपर्क साधला. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.