बुलडाणा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी २८ जूनला रेडीओद्वारे 'मन की बात' केली. यामध्ये फक्त शब्दांची हेराफेरी होती. केंद्र सरकार कोरोनाशी लढताना कमी पडत आहे. अशावेळी पंतप्रधानांनी मन की बात करण्यापेक्षा 'काम की बात' करावी, असे महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या. त्या पुण्यावरून अमरावतीला जात असताना सोमवारी खामगाव येथे धावती भेट दिली.
मोदींनी 'मन की बात' करण्यापेक्षा 'काम की बात' करावी - यशोमती ठाकूर
देशात दिवसेंदिवस कोरोनामुळे स्थिती गंभरी होत चालली आहे. या काळात मन की बात करून चालणार नाही. आता काम की बात करणे गरजेचे आहे. आता या देशावर मोठे संकट आले आहे. अर्थव्यवस्था पूर्ण कोसळली आहे. त्यासाठी आता पंतप्रधानांनी काम करणे गरजेचे आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
केंद्र शासन कोणत्याच राज्य शासनाला मदत करत नाही. भाजपचे सरकार असलेल्या राज्यात थोडाफार मदत होत असेल. देशात दिवसेंदिवस कोरोनामुळे स्थिती गंभरी होत चालली आहे. या काळात मन की बात करून चालणार नाही. आता काम की बात करणे गरजेचे आहे. आता या देशावर मोठे संकट आले आहे. अर्थव्यवस्था पूर्ण कोसळली आहे. त्यासाठी आता पंतप्रधानांनी काम करणे गरजेचे आहे, असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढविणे गरजेचे होते. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय चांगल्यरितीने काम करत आहेत. सर्व काही हळूहळू सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्र सरकारच्या मदतीविना आपण कोरोनावर मात करत असल्याचेही ठाकूर म्हणाल्या.