बुलडाणा - राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे गुरूवारी अनोख्या अंदाजात पहायला मिळाले. सिंदखेड राजा शहरात पाणीपुरी ठेल्यावर जात शिंगणे यांनी पाणीपुरी विक्रेत्यांना हँड ग्लोव्ह्ज वापरण्याच्या सुचना केल्या. तसेच स्वच्छता ठेवण्यासाठी देखील सुचना दिल्या.
हँड ग्लोव्ह्ज वापरा! अन्न व औषध मंत्र्यांची पाणीपुरी विक्रेत्यांना तंबी - पाणीपुरी विक्रेते
मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी अचानक राजवड्यासमोरील पाणीपुरी, भेळपुरी, आईस्क्रिम गाड्यांना भेट दिली.

हेही वाचा...मुंबई-लातूर-बिदर एक्सप्रेसमध्ये मारहाण; अत्यंविधीला जाणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी गुरुवारी बुलडाणा जिल्ह्यात मतदारसंघ दौऱ्यावेळी अचानक पाणीपुरी ठेल्यांना भेट दिली. मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना, सिंदखेडराजा विकास आराखड्यानुसार सुरू असलेल्या विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अचानक राजवड्यासमोरील पाणीपुरी, भेळपुरी, आईस्क्रिम गाड्यांना भेट दिली. त्यावेळी त्यांनी सर्वांना स्वच्छता ठेण्याचे तसेच पाणीपुरी विक्रेत्यांनी हँड ग्लोव्हज वापरण्याच्या सूचना केल्या. यावेळी मंत्री शिंगणे यांनी तेथील एका ठेल्यावर पाणीपुरीची चव देखील चाखली.