बाकीचे भाषण करतात नितीन गडकरी काम करतात - बच्चू कडू - nitin gadkari
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, नितीन गडकरी आणि उद्धवजी आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी पत्रात उपस्थित केलेले मुद्दे आधी तपासले पाहिजे आणि योग्य असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, अशी अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.
Minister of State Bachchu
बुलडाणा -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या लेटर बॉम्बवर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नितीन गडकरी आणि उद्धवजी आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी पत्रात उपस्थित केलेले मुद्दे आधी तपासले पाहिजे आणि योग्य असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, अशी अपेक्षा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त करीत बाकीचे भाषण करतात,मात्र नितीन गडकरी काम करतात अशी प्रतिक्रिया बुलडाण्याच्या शेगावात आज रविवारी दिली.
महाराष्ट्रात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामे सुरु आहेत. मात्र या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे आज शेगावात आल्यानंतर त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, नितीन गडकरी आणि उद्धवजी आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी पत्रात उपस्थित केलेले मुद्दे आधी तपासले पाहिजे आणि योग्य असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य कारवाई करतील, यासंदर्भात याला जबाबदार असलेला शिवसेनेचा नेता, कार्यकर्ता कितीही मोठा असला तरी मुख्यमंत्री कारवाई करतील, असा आशावाद बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
Last Updated : Aug 15, 2021, 10:32 PM IST