महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध- डॉ. राजेद्र शिगणे - बुलडाणा

सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले.

rajendra shingne
rajendra shingne

By

Published : Aug 15, 2021, 5:56 PM IST

बुलडाणा - सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (minister dr. rajendra shingne) यांनी केले. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (Buladana Collector Office) आज (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिनाच्या 75 व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

डॉ. राजेद्र शिगणे

जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 9 वाजून 5 मिनिटांनी ध्वजारोहण राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर त्यांनी जनतेशी संवाद साधला.

'जनतेच्या प्रश्नांसाठी सरकार कटीबद्ध'

'शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्या दृष्टिकोनातून काम केले जात आहे. कोरोनाच्या काळामध्ये बुलडाणा नागरिकांनी सहकार्य केले, त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे', असे शिंगणे यांनी म्हटले. यावेळी जिल्हाधिकारी रामा मूर्ती भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, स्वतत्र्य सैनिक, माजी सैनिक, पत्रकार उपस्थित होते.

हेही वाचा -'राज्य सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता?' 12 आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

ABOUT THE AUTHOR

...view details