महाराष्ट्र

maharashtra

राज्यातील सर्व अन्नपदार्थ विक्रेत्यांना ड्रेसकोड अनिवार्य; बुलडाण्यातून झाली सुरुवात

By

Published : Mar 9, 2020, 11:07 PM IST

सर्व विक्रेत्यांनी अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नये. अधिकाऱ्यांनी हातगाडीवरील विक्रेत्यांची तपासणी करून काही त्वचारोग तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी, असे निर्देशही डॉ. शिगणे यांनी आपल्या विभागाला दिले.

minister shingne buldana
अन्नपदार्थ विक्रत्यांना ॲप्रॉन आणि हातमोजे देताना मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

बुलडाणा - राज्यातील सर्व हातगाड्यांवरील अन्न पदार्थ विक्रेत्यांना ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे. या मोहिमेची सुरुवात सोमवारी शहरातून करण्यात आली. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी शहरातील चिंचोले चौक आणि चौपाटी येथील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अ‌ॅप्रॉन आणि हातमोजांचे वाटप केले. तसेच विक्रेत्यांच्या हातांची, नखांची स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून तपासणी करीत त्यांचे परवानेही तपासले.

प्रतिक्रिया देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून व संकल्पनेतून संपूर्ण राज्यात अन्न पदार्थविक्रेत्यांना ड्रेसकोड देण्यात येणार आहे. यावेळी सर्व हातगाडीवरील अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी चांगल्या व स्वच्छ वातावरणात विक्री करावी. त्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी. यापुढे अन्न व औषध प्रशासन विभाग राज्यात हातगाड्या तपासण्याची मोहीम राबविणार आहे. यामध्ये हातगाडीवरील विक्रेत्यांना अन्न पदार्थांची विक्री करताना अ‌ॅप्रोन, हातमोजे व कॅप घालणे बंधनकारक असणार आहे. यापुढे अन्न पदार्थांची विक्री करताना हातमोज्यांचा वापर सक्तीने करावे. याचा वापर न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.

त्याचबरोबर, सर्व विक्रेत्यांनी अन्न पदार्थ उघड्यावर ठेवू नये. अधिकाऱ्यांनी हातगाडीवरील विक्रेत्यांची तपासणी करून काही त्वचारोग तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी, असे निर्देशही डॉ. शिगणे यांनी आपल्या विभागाला दिले. यावेळी त्यांच्या सोबत सहाय्यक आयुक्त सचिन केदारे, गजानन घिरके, जनसंपर्क अधिकारी संतोष लोखंडे व विक्रेते उपस्थित होते.

हेही वाचा-कुंपणच खातंय शेत, पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानाच्या गावाला भ्रष्टाचाराची किड...

ABOUT THE AUTHOR

...view details