बुलडाणा-एका खुनाच्या प्रकरणात आरोपी असलेल्या ३० वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी शेगावात उघडकीस आली आहे. या घटनेने शेगावात एकच खळबळ उडाली आहे.
शेगावात दगडाने ठेचून युवकाची हत्या
राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (वय ३० वर्ष) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो मंदिर परिसरात राहायचा. त्याच्यावर काही वर्षांपूर्वी शुल्लक कारणावरून एका भिकाऱ्याला ठार मारल्याचा आरोप होता.
राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (वय ३०) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो मंदिर परिसरात राहायचा. त्याच्यावर काही वर्षांपूर्वी शुल्लक कारणावरून एका भिकाऱ्याला ठार मारल्याचा आरोप होता. नुकताच तो तुरुंगातून जामिनावर सुटून आला होता. आज सकाळी रेल्वेचे काही कर्मचारी जानोरी गेट जवळ गेले असता युवकाचा मतदेह रस्त्यावर पडलेला आढळून आला. घटनेची माहिती शेगाव शहर पोलिसांना मिळताच प्रभारी ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांनी आपल्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहे.
खामगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रेताची राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे अशी ओळख पटल्यानंतर त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली. सदर युवक मागील ३ दिवसांपासून घरून बेपत्ता असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. हत्येचा गुंता सुटलेला नसून पोलीस त्याचा तपास करीत आहेत.