बुलडाणा- दरोडयासारख्या गंभीर गुन्ह्याचा कट मेहरकर पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी सुलतानपूर ते मेहकर रोडवरील सुलतानपूर नदीपुलाजवळून 7 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून टाटा सफारीसह 1 लाख 9 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुलतानपूर ते मेहकर रोडवरील सुलतानपूर नदीपुलाजवळ शुक्रवारी दुपारी टाटा सफारी उभी होती. वाहनामध्ये असलेल्या ८ व्यक्तींकडे लोखंडी हत्यार असून ते कोणाला तरी लुटण्याच्या तयारीने असल्याची खात्रीलायक माहीती मेहकर पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रभाकर सानप , पोलीस कॉन्स्टेबल निवृत्ती सानप , गणेश लोढे , राजेश उंबरकर , विजय आंधळे हे पोलीस वाहनासह दोन पंचांना घेऊन घटनास्थळ गेले. घटनास्थळांवरून 3 आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांचा पाठलाग करीत दोघांना अटक केले आहे. एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला आहे. या 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-व्वा रे पठ्ठ्या... मिरचीच्या पिकावर फवारली देशी दारू!