बुलडाणा- जिल्ह्यातील लोणार शहरातील मुख्य रस्त्यावरील ३ दुकानास आग लागल्याची घटना घडली. या आगीत कपडा दुकान, स्टेशनरी व किराणा दुकानातील लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. 2 मार्च (मंगळवार)च्या सायंकाळी ही घटना घडली. ही आग कश्यामुळे लागली याचा तपास सुरू आहे.
लोणारमध्ये 3 दुकानाांना भीषण आग, लाखो रूपयांचे नुकसान - lonar shop fire news
या आगीमध्ये तिन्ही दुकानाचे सर्व साहीत्य जळुन अंदाजे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाले आहे. आग विझवताना अग्नीशामक दलाचे कर्मचारी शेख खालीक वाहनावरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहे.
![लोणारमध्ये 3 दुकानाांना भीषण आग, लाखो रूपयांचे नुकसान लोणारमध्ये 3 दुकानाांना भीषण आग](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10850566-196-10850566-1614757607709.jpg)
लोणारमध्ये 3 दुकानाांना भीषण आग
अग्नीशामकच्या वाहनावरून पडल्याने चालक गंभीर जखमी
या आगीमध्ये तिन्ही दुकानाचे सर्व साहीत्य जळुन अंदाजे ६० ते ७० लाखांचे नुकसान झाले आहे. आग विझवताना अग्नीशामक दलाचे कर्मचारी शेख खालीक वाहनावरून पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. मात्र. आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही.
Last Updated : Mar 3, 2021, 3:19 PM IST