महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिरोली हल्ला : मुलाचे जावळ काढण्यासाठी येतो म्हणणारा राजू परत आलाच नाही - raju gaikwad

दोन महिन्यांपूर्वी सुद्धा पुलवामा हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्याचे दोन जवानांना वीरमरण आले होते. हे दुःख सरत नाही तोच पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर जिल्ह्यावर कोसळला आहे.

राजु नारायण गायकवाड

By

Published : May 2, 2019, 12:11 PM IST

बुलडाणा - गडचिरोली येथील जांभूरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष करत हल्ला केला. या हल्यात १५ जवानांना वीरमरण आले. या वीरमरण आलेल्या जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगांवराजा तालुक्यातील आळंद गावच्या सर्जेराव एकनाथ खार्डे, तसेच मेहकर येथील जवान राजु नारायण गायकवाड यांचा समावेश आहे.

मुलाचे जावळ काढण्यासाठी येतो म्हणणारा राजू परत आलाच नाही

या घटनेने महाराष्ट्र हादरला असून जिल्ह्यातील जवान शहीद झाल्याने संपूर्ण बुलडाण्यामध्ये शोककळा पसरली आहे. दोन महिन्यांपूर्वी सुद्धा पुलवामा हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्याचे दोन जवानांना वीरमरण आले होते. हे दुःख सरत नाही तोच पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर जिल्ह्यावर कोसळला आहे.

मेहकर येथील जवान राजू गायकवाड हे ५ एप्रिलला आपल्या मुलाचे जावळ काढण्यासाठी मेहकर येथे येणार होते. मात्र, आता राजू गायकवाड कधीच परत येणार नाही. दोन वर्षांपूर्वी राजू गायकवाड यांच्या मोठ्या भावाचे निधन झाले होते. यातून गायकवाड कुटुंब सावरत नाही तोच नक्षली हल्ल्यात घरातील कर्ता पुरूष कुटुंबाने गमावला. त्यामुळे आता घरातील वृद्ध आई - वडील, पत्नी आणि मुलाबाळांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न कुटुंबाला पडला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details