महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बेलगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बेलगाव येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

married woman has committed suicide I,n Belgaum
बेलगाव येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, सासरच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By

Published : Apr 6, 2021, 6:47 PM IST

बुलडाणा - विवाहितेने सासरच्या त्रासामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 5 एप्रिलला सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी सासरच्या पाच जणांविरुद्ध डोंडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जेसीबी घेण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये आणण्याचा तगादा -

बेलगाव येथील विवाहिता प्रतीक्षा वानखेडे हिला पती गजानन वानखेडे व त्यांचे नातेवाईक जेसीबी विकत घेण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये आणण्यासाठी वारंवार मागणी करत होते. त्यासाठी तिला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. या सर्व छळाला कंटाळून प्रतीक्षा हिने अखेर गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी प्रतीक्षाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पती गजानन वानखेडे व त्याचे आईवडील बालाजी वानखेडे, मंदोदरी वानखेडे यांचेसह मनिषा रामेश्वर बोडखे, अश्विनी सोमेश बाजड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून हलणार नसल्याचा पवित्रा प्रतीक्षाच्या माहेरच्या लोकांनी घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून समजूत काढण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details