बुलडाणा -राज्यात परतीच्या पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुलडाण्यातील मलकापूर भागातील शेतीच्या पिकांची पाहणी काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी शनिवारी केली. या पाहणी नंतर त्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून प्रति हेक्टर 25 हजार रुपये देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
आमदार राजेश एकडेंकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजारांची आर्थिक मदत देण्याची मागणी हेही वाचा.... विजयाच्या जल्लोषात न रमता आमदार धावले शेतकऱ्यांच्या मदतीला
मागील ५ ते ६ वर्षापासून बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी सतत दुष्काळाचा सामना करत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे याही वर्षी जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीमध्ये असलेले सोयाबीन, कापलेले सोयाबीन, ज्वारीचे पिक, मका, तसेच कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
हेही वाचा... विजयोत्सव बाजूला ठेवत धनंजय मुंडे शेतकऱ्यांच्या मदतीला
मलकापूर मतदारसंघातील नवनिर्वाचित काँग्रेसचे आमदार राजेश एकडे यांनी दहिवडी, शेलगाव मुकुंद, नायगाव, पिंपरी आढाव, पोटा, तरवाडी, खैरा, जवळा बाजार या ठिकाणीच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी त्यांनी नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली.