बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर येथील काँग्रेसचे नगराध्यक्ष अॅड. हरीश रावळ यांच्यासह ६ जणांना मलकापूर शहर पोलिसांनी आज ११ वाजण्याच्या सुमारास अटक केली. रावळ यांच्यासह २५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -
किरण साळुंके ही व्यक्ती १७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत हरीश रावळ यांच्याघरी येऊन त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत होती. या दरम्यान, किरणने रावळ यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्याला बराचवेळ समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवीगाळ करणे सुरू ठेवले. यानंतर त्याला हरीश रावळ, प्रमोद उज्जैनकर, निरंजन लेले, संतोष उज्जैनकर यांच्यासह पंचवीस जणांनी बेदम मारहाण केली.