महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत अफरातफर; ठेवीदारांचे उपोषण

चिखली शहरातील महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्ष व कर्मचाऱ्यांवर आर्थिक घोटाळाप्रकरणी 12 जुलै2019 रोजी चिखली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. चार कोटी पर्यंतचा हा घोटाळा आहे.

mahatma-phule-co-operative-bank-fraud-in-buldana
mahatma-phule-co-operative-bank-fraud-in-buldana

By

Published : Jan 23, 2020, 11:24 PM IST

बुलडाणा-चिखली मधील महात्मा फुले नागरी सहकारी पतसंस्थेत अफरातफर करणाऱ्या सर्व संचालकांवर गुन्हे दाखल कारावे. तसेच दोषी लेखापरीक्षण अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेवी व्याजासह देण्याच्या मागणीसाठी चिखली सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा मीडिया प्रमुख भरत जोगदंडे यांच्या नेतृत्वात ठेवीदारांनी हे आमरण उपोषण सुरू केले आहे. आज (गुरुवारी) उपोषणाचा चौथा दिवस आहे. मात्र, प्रशासनाने या उपोषणची दखल घेतली नाही.

ठेवीदारांचे उपोषण

हेही वाचा-ग्राहकांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर आणखी उतरले

चिखली शहरातील महात्मा फुले पतसंस्थेच्या अध्यक्ष व कर्मचाऱ्यांवर आर्थिक घोटाळाप्रकरणी 12 जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. चार कोटी पर्यंतचा हा घोटाळा आहे. या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गणपत खरात, मुख्य शाखा व्यवस्थापक सतिश प्रल्हाद वाघ, रोखपाल परमेश्वर सुखदेव पवार, शाखा व्यवस्थापक गणेश कचरुजी खंडागळे यांनी अपरातफर केल्याचे निर्देशनास आले. त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये उर्वरित संचालकांना वगळण्यात आले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे. पतसंस्थेचे 2011 ते 2019 पर्यंतचे चुकीचे लेखापरीक्षण करून अवेक्षण अहवाल सादर करणाऱ्या, सदर संस्था सातत्याने अ वर्ग दाखवून शासन प्रशासन व संस्थेच्या ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या, तत्कालीन सर्व जबाबदार नियुक्त लेखापरिक्षण अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच यातील दोषींवर कारवाई करावी. यासह अन्य मागण्यासाठी हे उपोषण सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details