महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अरुण जेटलींच्या निधनामुळे महाजनादेश यात्रा स्थगित; मुख्यमंत्र्यांची घोषणा - अरुण जेटली निधन

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापुरात केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापूरात केली.

By

Published : Aug 24, 2019, 5:10 PM IST

Updated : Aug 25, 2019, 1:11 PM IST

बुलडाणा - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापुरात केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्यामुळे महाजनादेश यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलकापूरात केली.

सरकारने पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा आढावा जनतेसमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा आज बुलढाण्यात दाखल झाली होती. दुपारी साडे बाराच्या दरम्यान विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर शहरात मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. मात्र, त्या आधीच माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची निधनवार्ता मुख्यमंत्र्यांना मिळताच त्यांनी मलकापूर येथे सभास्थळी पोहचून स्वागत-सत्कार न स्वीकारता महाजनादेश यात्रा २५ ऑगस्टपर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली. सोमवारी (दि.२६ऑगस्ट) मूळ कार्यक्रमानुसार पाथर्डी येथून यात्रा पुढे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय अरुण जेटली यांच्या विषयी शोक संवेदना व्यक्त करून उपस्थितांसह श्रद्धांजली अर्पण केली. तसेच पुढील सर्व कार्यक्रम तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Aug 25, 2019, 1:11 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details