महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रेयसीच्या घरात सापडल्याने प्रियकराला बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू - प्रेयसीच्या घरात सापडल्याने प्रियकराला बेदम मारहाण

रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर दिवे हा प्रेयसीच्या घरात लपून बसलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर उपचारादरम्यान ज्ञानेश्वरचा बुधवारी शेगावात मृत्यू झाला.

प्रियकराचा मृत्यू
प्रियकराचा मृत्यू

By

Published : Feb 5, 2020, 11:37 PM IST

बुलडाणा - दोन दिवसानंतर लग्न असलेल्या प्रेयसीच्या घरात रात्रीच्या वेळेस सापडलेल्या प्रियकराला प्रेयसीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याने प्रियकराचा मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवार) संग्रामपूर तालुक्यातील सावळा या गावात घडली. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी प्रेयसीकडील ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर देवेंद्र घिवे (वय 32) याचे लग्न झालेले असून त्याचे घरासमोरच राहणाऱ्या एका तरुणीसोबत गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या तरुणीचे लग्न ७ फेब्रुवारीला होणार होते. दरम्यान, 4 फेब्रुवारीच्या रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ज्ञानेश्वर दिवे हा प्रेयसीच्या घरात लपून बसलेल्या स्थितीत आढळून आला. त्यामुळे संतापलेल्या प्रेयसीच्या नातेवाईकांनी त्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर उपचारादरम्यान ज्ञानेश्वरचा बुधवारी शेगावात मृत्यू झाला. ज्ञानेश्वरचे वडील देवेंद्र घिवे यांनी पोलिसात याबाबत तक्रार दिली.

हेही वाचा -कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ७१ शिक्षक बीएलओंवर गुन्हे दाखल; राज्यातील सर्वात मोठी कारवाई

तक्रारीवरून तामगाव पोलिसांनी प्रेयसीच्या ८ नातेवाईकांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपी सध्या फरार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास तामगाव पोलीस करत आहेत.

हेही वाचा -बुलडाणा : शेगावच्या मुख्य रस्त्यावरील 'ड्रेनेज'काम संथ गितीने, नागरिकांमध्ये रोष

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details