बुलडाणा - प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक भूमिका घेत आहे, तर दुसरीकडे मात्र प्रत्येक नागरिक आपल्या सोयीसाठी व सुविधेसाठी गर्दी करत आहे. असेच चित्र आज सकाळी बुलडाणा शहरातील पेट्रोल पंप परिसरामध्ये दिसून आले.
पेट्रोल पंपावरील गर्दीचे दृश्य हेही वाचा -बुलडाणा जिल्ह्यात उद्यापासून 20 में पर्यंत कडक लॉकडाऊन
जिल्ह्यामध्ये आज रात्री 8 वाजेपासून कडक लॉकडाऊन सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी बुलडाणा शहरातील 6 पेट्रोल पंपांवर नागरिकांनी गर्दी केली. त्यामुळे, पेट्रोल पंप परिसरामध्ये शेकडो वाहन धारकांच्या लांब रांगा दिसून आल्या.
दहा दिवस सर्व सामान्यांना मिळणार नाही पेट्रोल - डिझेल
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या बुलडाणा शहरामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासन कठोर भूमिका घेत आहे. या पार्श्वभूमीवर 10 मे ते 20 मे दरम्यान संपूर्ण जिल्ह्यामध्ये मेडिकल सेवा वगळता इतर प्रतिष्ठाने पूर्णतः बंद ठेवण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. या आदेशामध्ये सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे आपल्या वाहनांमध्ये पुरेसे इंधन आजच भरून घ्यावे, या विचारातून वाहनधारकांनी बुलडाणा शहरातील 6 पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी केली. त्यामुळे, पेट्रोल पंप परिसरामध्ये वाहनधारकांची लांब रांग दिसून आली.
हेही वाचा -भेंडवळच्या घडमांडणीचे भाकीत होणार मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत