महाराष्ट्र

maharashtra

दिलासादायक.. लॉकडाऊनमुळे अमरावती व बुलडाण्यात दैनंदिन रुग्णसंख्येत घट, तर रिकव्हरी रेट वाढला

By

Published : May 21, 2021, 7:45 PM IST

महाराष्ट्राच्या कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने राज्यात पहिल्यांदाच कोरोनाचा उद्रेक झालेल्या अमरावती व बुलडाणा जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. मागच्या आठवड्य़ात अमरावतीचा पॉझिटिव्हीटी दर २७ टक्के तर बुवडाण्याचा पॉझिटिव्हीटी दर ३७ टक्के होता.

reduces daily number of corona patients in Amravati and Buldana
reduces daily number of corona patients in Amravati and Buldana

मुंबई -राज्यात लॉकडाऊन लागू करण्याच्या आधी म्हणजे १६ एप्रिल रोजी अमरावतीमध्ये सक्रीय रुग्णसंख्या ४८७४ होती. आत जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ०९,७१२ आहे. बुलडाण्यात १६ एप्रिल रोजी ५८७३ रुग्णसंख्या होती. यामध्ये आता २७३७ रुग्णांची भर पडली आहे.

कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना दुसऱ्या लाटेच्यावेळी सर्वाधिक रुग्णांची अमरावतीमध्ये नोंद झाले होते. यावरून कोरोनाची दुसरी लाट अमरावती येथून सुरू झाल्याचे म्हटले जाते. विशेष म्हणजे, याच जिल्ह्यात दुसरी लाटेतील रुग्ण कमी झाले असताना अलीकडे रुग्ण वाढत असल्याने ही तिसरी लाट तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

ईटीव्ही भारतने घेतलेली मुलाखत

अमरावती महाराष्ट्रातील पहिला जिल्हा होता ज्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने फेब्रुवारीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने मार्च महिन्यात १० दिवसांचा लॉकडाऊन लागू केल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवता आले. ९ ते १५ एप्रिल या काळात अमरावतीमध्ये प्रतिदिन सरासरी ४२६ रुग्ण आढळत होते. मात्र ८ ते १४ मे या आठवड्यात सरासरी १०६० रुग्ण आढळत आहेत. मात्र याच काळात महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा ६५ हजार ते ४० हजार असा उतरता आहे. अमरावतीमध्ये कोरोनाचा कहर ग्रामीण भागात जास्त आहे. जिल्ह्यात मृतांमध्ये तरुण वयोगटाचे प्रमाण अधिक आहे.

अमरावतीमध्ये कोरोना रुग्णवाढीला ब्रेक -

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने फेब्रुवारी महिन्यापासून अमरावती जिल्ह्यात थैमान घातले असताना आता लॉकडाऊनचा परिणाम जाणवायला लागला आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ओसरायला लागली असून अमरावतीकरांमध्ये कोरोनामुक्तीची आशा निर्माण झाली आहे.

अमरावती जिल्ह्यात सध्याघाडीला कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 9 हजार 712 इतकी आहे. यापैकी 2 हजार 49 रुग्णांवर उपचार सुरू असून अमरावती शहरात एक हजार 834 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर 5 हजार 829 रुग्ण ग्रामीण भागात गृहविलगीकरणात आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 87.09 इतका असून रुग्ण दुप्पटीचा रेट 54 टक्के आहे. जिल्ह्यात कोरोनमुळे एक हजार 303 जण दगावले असून जिल्ह्याचा डेथ रेट 1.53 इतका आहे.

..असा आहे कोरोना रुग्णांचा आलेख -

अमरावती जिल्ह्यात 7 एप्रिल रोजी 344 कोरोना रुग्ण आढळून आले होते. 8 एप्रिलला 378 रुग्ण आढळून आलेत. 9 एप्रिल 425, 10 एप्रिलला 398, 11 एप्रिलला 455, 12 एप्रिलला 414, 13 एप्रिलला 552, 14 एप्रिलला 649, 15 एप्रिलला 535, 16 एप्रिलला 680, 17 एप्रिलला 799, 18 एप्रिलला 596, 19 एप्रिलला 593, 20 एप्रिलला 700, 21 एप्रिलला 520, 22 एप्रिलला 739, 23 एप्रिलला 652, 24 एप्रिलला 704, 25 एप्रिलला 685, 26 एप्रिलला 869, 27 एप्रिलला 838, 28 एप्रिलला 946, 29 एप्रिलला 934, 30 एप्रिलला 965 इतके रुग्ण आढळले. मे महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजारावर गेला होता. 1 मे रोजी 980 कोरोना रुग्ण आढळले, 2 मे रोजी 804, 3 मे रोजी 903, 4 मे रोजी 1 हजार 123 कोरोना रुग्ण रुग्ण आढळून आलेत. 5 मे रोजी 1 हजार 167, 6 मे रोजी 1 हजार 189, 7 मे रोजी 1 हजार 125, 8 मे रोजी 1 हजार 241, 9 मे रोजी 1 हजार 186 रुग्ण आढळले होते. 10 मे रोजी एक हजार 5 , 11 मे रोजी एक हजार 16,

दिनांक अमरावती जिल्ह्यातील पॉझिटिव्ह केसेस
१२ मे २०२१ एक हजार ९२
१३ मे २०२१ एक हजार 188
१४ मे २०२१ 922
१५ मे २०२१ 1097
१६ मे २०२१ एक हजार 175
१७ मे २०२१ 870
१८ मे २०२१ 798
१९ मे २०२१ 701

12 मे रोजी 1092, 13 मे रोजी 1 हजार 188, 14 मे रोजी 922 15 मे रोजी 1097, 16 मे रोजी 1 हजार 175 कोरोना रुग्ण आढळून आलेत. 17 मे रोजी मात्र 870 रुग्ण आढल्यावर अमरावतीकरांना काहीसा दिलासा भेटला. त्यानंतर 18 मे रोजी 798 आणि 19 मे रोजी 701 कोरोना रुग्ण आढळून आलेत.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दररोज हजाराने वाढ होत असताना अमरावतीकर हादरले होते. आता तीन दिवसंपासून ही संख्या हजाराच्या खाली गेल्याने अमरावतीकर काहीसे सुखावले आहेत. अमरावती जिल्ह्यात 9 मे पासून 22 मे पर्यंत कठोर संचारबंदी लागू आहे. शासकीय कार्यलय सुद्धा या संचारबंदीत बंद असून कोरोनाला आटोक्यात आणण्यास ही संचारबंदी फायदेशीर ठरली आहे

साडे तीनशे लोकसंख्येच्या गावात ५७ कोरोनाबाधित -

अमरावती-वर्धा जिल्हा सिमेवर अमरावती जिल्ह्यातील शेवटचे गाव तिवसा तालुक्यातील जुनी भारवाडी गाव आहे. ३५० लोकसंख्येच्या या गावात पंधरा दिवसात तब्बल ५७ कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर गावात ६५ टक्के लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या. आता एक महिन्यापासून एकही नवा रुग्ण नाही.

बुलडाण्यात लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णसंख्येत घट -

बुलडाणा जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लावण्यात आले होते. यामूळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या घटताना दिसत आहे. मागील बुधवारी 12 मे ची पॉझिटिव्ह संख्या बघितली तर 5 हजार 599 घेण्यात आलेले स्वबच्या नमुन्यापैकी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते आणि आठवड्यानंतर आज या बुधवारी 19 मे रोजी चाचणीसाठी घेण्यात आलेल्या 6 हजार 610 स्वॅबच्या नमुन्यापैकी 674 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

12 मे रोजी 5 हजार 599 चाचणी करण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यापैकी 1 हजार 143 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले होते. याचा पॉझिटिव्हिटी रेट 19.19 टक्के होता.

19 मे रोजीची टक्केवारीची परिस्थिती बघितली तर 6 हजार 610 चाचणी करण्यात आलेल्या स्वॅबच्या नमुन्यापैकी 674 नमुन्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. याचा पॉझिटिव्हीटी रेट 10.20 टक्के आहे. रिकव्हरी रेट ९२.४५ टक्के होता.

दिनांक कोरोना चाचण्यांची संख्या पॉझिटिव्ह संख्या पॉझिटिव्हीटी रेट रिकव्हरी रेट
१२ मे २०२१ ५ हजार ५९९ १ हजार १४३ १९.१९ ९२.४५
१३ मे २०२१ ४ हजार ६३७ एक हजार ६० १९.१४ ९२.५३
१४ मे २०२१ ४ हजार ६९५ १ हजार २२८ १९.३२ ९१.८२
१५ मे २०२१ २ हजार १२५ ८७८ १८.२६ ९१.७६
१६ मे २०२१ ४ हजार ८५० ८७२ १७.७८ ९१.८७
१७ मे २०२१ ४ हजार ६०७ ५५० ११.६४ ९२.३२
१८ मे २०२१ ६ हजार ८६९ ८०४ ११.५४ ९२.५३
१९ मे २०२१ ६ हजार ६१० ६७४ १०.२० ९२.४५

एचआरसिटी स्कोर अधिक असूनही कोरोनावर मात -

कोरोना झाला की, सर्वात आधी त्या रुग्णाचा सिटीस्कॅनद्वारे एचआरसिटी काढला जातो आणि त्यामध्ये समोर येतो तो म्हणजे कोरोनाचा स्कोर किती पर्यंत आहे. कारण त्या स्कोर प्रमाणे उपचाराला सुरुवात होते आणि जर स्कोर 18 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर रुग्णांची परिस्थिती नाजूक असल्याचे मानले जाते. तो रुग्ण वाचू शकत नाही असा सर्वसाधारण समज आहे. मात्र हा समज मोडून काढला आहे बुलडाणा तालुक्यातील मौंढाळा येथील 85 वर्षीय आजोबांनी. त्यांचा कोरोनाचा 21 चा स्कोर असतानाही त्यांनी कोरोनावर विजय मिळविला. बुलडाण्याच्या कोविड सेंटरमधून या 85 वर्षीय आजोबांना रविवारी 17 मे ला सुट्टी देण्यात आली. शामराव वाघमारे असे या आजोबांचे नाव आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details