महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाणा: धामणगाव धाड येथील धान्य गोडाऊनवर गुन्हे शाखेचा छापा; 180 क्विंटल धान्य जप्त - Nadim beg godown dhamangaon dhad raid

गोदामातील धान्य हे शासकीय वितरण प्रणालीतील धान्य विना परवाना साठवून ठेवला जात असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोडाऊन सील केले आहे. त्यानंतर या प्रकरणाबाबत बुलडाणा तहसीलदार यांना पत्र देण्यात आले आहे.

Arrested criminals
Arrested criminals

By

Published : Jun 18, 2020, 9:42 PM IST

बुलडाणा- सरकारचे रेशन अवैधरित्या साठवून ठेवल्याचा माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी धामणगाव धाड येथील एका गोडाऊनवर छापा मारला. कारवाईत पथकाने अंदाजे 180 क्विंटल धान्य जप्त केले आहे. हे धान्य शासकीय वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही याची तपासणी बुलडाणा तहसील विभागामार्फत केली जात आहे.

बुलडाणा तालुक्यातील ताराडखेड येथील नदीम बेग यांनी धामणगाव धाड येथील प्रकाश श्रीराम सपकाळ यांच्या मालकीचे गोदाम भाडेतत्वावर घेतले आहे. या गोदामात शासनाच्या रेशनचे धान्य अवैध पद्धतीने ठेवले असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, पोलीस उपनिरीक्षक इमरान इनामदार व इतर कर्मचाऱ्यांनी सदर गोडाऊनवर मंगळवारी (16 जून) छापा मारला. त्यावेळी 2 व्यक्ती संशयास्पद स्थितीत धान्याची पोती गोदामात रचताना दिसून आली. गोदामाची पाहणी केली असता त्यात अंदाजे तांदूळ 200 कट्टे, मका 150 कट्टे, गहू 12 कट्टे, हरभरा 10 कट्टे असे अंदाजे 180 क्विंटल धान्य असल्याचे दिसून आले.

याबाबत चौकशी केली असता सदर धान्य हे शासकीय वितरण प्रणालीतील धान्य विना परवाना साठवून ठेवला जात असल्याच्या संशयावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोडाऊन सील केले. त्यानंतर या प्रकरणाबाबत बुलडाणा तहसीलदार यांना पत्र देण्यात आले. त्यानंतर बुलडाणा पुरवठा निरीक्षक जूमडे व नायब तहसीलदार अमरसिंह पवार हे घटनास्थळी पोहोचले. सदर धान्यसाठा हा शासकीय वितरण प्रणालीतील आहे किंवा नाही याची तपासणी बुलडाणा पुरवठा विभागातर्फे केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित्यांना ताब्यात घेतले असू त्यांच्याशी विचारपूस केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details