बुलडाणा Little Girl Rape Case : जिल्ह्यातील बोराखेडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चॉकलेटचे आमिष देऊन एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने बालिकेवर अत्याचार केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. बालिका बेशुद्ध झाली, मात्र तिला मृत समजून आरोपीनं पलायन केलं. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पडक्या घराजवळून एक व्यक्ती जात असताना घरातून बालिकेचा आवाज आला. त्यानं घराची कडी उघडून पाहिल्यानंतर पीडित बालिका दिसून आली. त्यावेळी तिच्या शरीरातून रक्तस्त्राव होत होता.
अल्पवयीन तरुण पोलिसांच्या ताब्यात : त्यानंतर पीडित बालिकेला बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच बोरखेडी ठाणेदार बळीराम गिते पथकासह गावात दाखल झाले. आरोपीची माहिती घेत या अल्पवयीन तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी बोराखेडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या बालिकेची तब्येत गंभीर आहे. या बालिकेला अकोला येथील रुग्णाल्यात भरती करण्यात आलंय.