रविकांत तुपकर यांची प्रतिक्रिया बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar farmer leader) यांना संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghatana) शिस्तपालन समितीसमोर उपस्थित राहून आपले म्हणणे मांडण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, रविकांत तुपकर यांनी समितीसमोर हजर न होता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांना सविस्तर पत्र लिहिले (Ravikant Tupkar's letter to Raju Shetty) आहे.
एकच गोष्ट किती वेळा सांगू : या पत्राद्वारे त्यांनी आपल्या तक्रारी आणि आक्षेप सविस्तरपणे मांडले आहे. शिवाय त्यांनी शिस्तपालन समितीचे अध्यक्ष, सदस्यांना सविस्तर पत्र पाठवल्याचे माहिती आहे. आम्ही चार-पाच वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींना (Swabhimani Shetkari Sanghatana) वारंवार सांगत आहोत. शिवाय शिस्तपालन समितीच्या तत्कालीन अध्यक्षांशी फोनवरून सविस्तर चर्चा झाली आहे. एकच गोष्ट कितीवेळा पुन्हा-पुन्हा मी समितीला सांगू? या आगोदर देखील समितीला सविस्तर उत्तरे दिली आहेत, असे रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे.
शेकडो गुन्ह्यांचा पत्रात उल्लेख : रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांना लिहिलेल्या पत्रात संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सर्व घडामोडी तसेच उपक्रमांचा उल्लेख आहे. शिवाय संघटनेची विविध आंदोलने, तुपकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेले शेकडो गुन्ह्यांचा पत्रात तुपकर यांनी उल्लेख केला आहे. पोलिसांनी केलेला लाठीमार, मारहाण, तुरुंगवास, विविध आंदोलनाचा या पत्रात रविकांत तुपकर यांनी संदर्भ दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजकीय प्रवासाबाबत देखील तुपकर यांनी पत्रात राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
राजू शेट्टींना पाठवले 10 पानांचे पत्र : राजू शेट्टी यांची प्रत्येक निवडणुकीत बदलणारी राजकीय भूमिका, त्याचा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर होणारा परिणाम, संघटनेच्या कार्यपद्धतीवरील आक्षेप आदी बाबी पत्रात तुपकर यांनी मांडल्या आहेत. या पत्रात तुपकरांनी नेमका कशावर आक्षेप घेतला हे सांगता येत नाही, तरी 9 ते 10 पानांच्या या पत्रात तुपकर यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या वेदना मांडल्या असल्याची माहिती आहे. आता तुपकर यांच्या आक्षेपावर राजू शेट्टी तसेच शिस्तपालन समिती काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -
- Jalindar Patil on Ravikant Tupkar : '15 ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांनी समितीसमोर आपले म्हणणे मांडावे'
- Ravikant Tupkar News : संघटनेत राहूनच मी काम करणार, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांकरता लढणार - रविकांत तुपकर
- Ravikant Tupkar: मुंबईत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तर रक्तपात होईल, रविकांत तुपकरांचा इशारा