महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Samriddhi Highway Accident Issue : समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी 'Let the Road talk' संकल्पना राबविणार; जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पुढाकार - लेट्‌स टॉक कंसेप्ट

समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी '(Let the Road talk)' संकल्पना राबविली जाणार आहे. (Samriddhi Highway Accident Issue) जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची ही संकल्पना आहे. यासंदर्भात समृद्धी महामार्गाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक बुलडाणा पोलीस मुख्यालय येथे घेतली. यामध्ये अपघात रोखण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात आला आहे. (Police Superintendent Sunil Kadasane)

Samriddhi Highway Accident Issue
जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने

By

Published : Jul 4, 2023, 10:10 PM IST

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकांनी सुचविले उपाय

बुलडाणा : जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर खासगी लक्झरी बसच्या झालेल्या अपघातात आगीत होरपळून 25 जणांचा मृत्यू झाल्याच्या (Let the Road talk) दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा पोलीस सुनिल कडासने हे ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहे. यानंतर समृद्धी महामार्गावर अपघात घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी समृद्धी महामार्गाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एक बैठक बुलडाणा पोलीस मुख्यालय येथे घेतली. (Samriddhi Highway या बैठकीमध्ये आरोग्य विभागाचे, एमएसआरडीसी विभागाचे, उपप्रादेशिक परिवहन विभागाचे, महामार्ग पोलीस विभागाचे, मेहकर व सिंदखेड राजा विभागाचे पाच पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व जिल्हा सरकारी अभियोक्ता यांनी आपला सहभाग नोंदविला. (Police Superintendent Sunil Kadasane)

समृद्धी महामार्गावर कारचे सर्वाधिक अपघात :आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या 22 अपघात हे कारचे अपघात झाले आहे. या अपघाताचे कारण म्हणजे वाहनांचा स्पीड, चालकाला लागलेली डुलकी, चालकाचा नियंत्रण चुकल्यामुळे यासह अनेक वेगवेगळी कारणे समोर आली आहे. या कारणाने पुढे अपघात होऊ नये याकरिता या बैठकीत समृद्धी महामार्गावर दिशादर्शक फलक लावणे, ठरवून दिलेल्या लेनमध्ये वाहने चालवणे, जनतेमध्ये समृद्धी महामार्गवर प्रवास करण्याकरिता जनजागृती करणे, चालकाला डुलकी येऊ नये यासाठी उपाययोजना करणे, प्रत्येक 40 ते 45 किलोमीटर अंतरामध्ये रिफ्रेशमेंट सेंटर उभारणे, रस्त्यावर स्पीड ब्रेकर्स बसविणे जेणे करून चालकाचा मेंदू ॲक्टिव्ह राहणार अशा अनेक उपाय योजना बैठकीत ठरल्या. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी स्थापन केलेल्या समितीमधील अधिकारी एकमेकांच्या संपर्कात राहून या उपाययोजना करणार आहे.

समृद्धी महामार्गावर होणार वाहनांची तपासणी :बुलडाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी मार्गावर होणाऱ्या अपघातांना प्रतिबंध करण्यासाठी संबंधित ५ पोलीस ठाण्यांची समिती गठीत करण्यात आल्याची माहितीही कडासने यांनी दिली. हे समृ्द्धीवर होणारे अपघात कुठे तरी रोखल्‍या गेले पाहिजे. अपघातात मृत्‍यू होणारा आकडा हा रोखला गेला पाहिजे. होणारे अपघात थांबविण्यासाठी आज दि. ४ जुलै रोजी जिल्‍हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागाने संबाधित विभागातील अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक घेतली. समृद्धी महार्गावर कोणत्या उपाय योजना केल्या पाहिजे. यावर विचार विनिमय करण्यात आला. जिल्हातून 87 किमी समृद्गी महामार्ग जातोय. सर्वांत जास्त अपघात बुलडाणा जिल्ह्यातच झाले असून हे अपघात रात्रीच्या सुमारास होऊन कारचे अपघात जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसरात्र समृद्धीवर पोलीस विभागाचा पहारा असणार आहे. वाहन चालकांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गवर चढण्याआधी वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. त्‍यानंतरच ते वाहने पुढे जाणार आहे. त्या वाहनचालकांना फ्रेंश होण्याकरिता त्‍या महामार्गावर उपयोजना करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details